

गोंदिया. प्रयास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रक्तदान व जीवनदानाचा उपक्रम राबवून अविरत सेवा करणारे युवा रक्तदूत कपिल बावनथडे यांचे स्तुत्य कार्य पाहून त्यांचा आज नागपुरात सत्कार व सन्मान करण्यात आला.
आज दिनांक 15 डिसेंबर रोजी नागपुरात कोसरे कलार समाज ट्रस्ट नागपूर तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गोंदिया येथील प्रयास बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री कपिल बावनथडे यांचा कलार समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांच्या तर्फे रक्तदान ट्रस्ट नागपूरचे अध्यक्ष श्री.फाल्गुनजी उके व सचिव डॉ.विजय जी मानकर कलार समाज संस्था भंडारा चे सचिव श्री.सचिनजी उके व समस्त समाजातील आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते मला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
त्यांच्या या कार्याचे सर्व समाज बांधवांनी भरभरून कौतुक केले व भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.