राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून तिरोड़ा शहरातील अनेक नागरिकांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर 2025) रोजी स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विक्रांत भोये उपस्थित होते. त्यांनी नवागत सदस्यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.
नवीन प्रवेश घेतलेल्या सदस्यांनी सांगितले की, त्यांनी पक्षाच्या सामाजिक आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे. समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या वेळी तालुकाध्यक्ष कैलास पाटले, ओमप्रकाश रहांगडाले, युवा अध्यक्ष एम. डी. पाटले, महिला अध्यक्षा भाग्यश्री केळवणकर, शहर अध्यक्ष आशिष येरेपुडे, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, उपाध्यक्ष विजय बुडे, ज्योती मेश्राम, मंगेश गोंडन, रविकांत मेश्राम, मंदा टेंभरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले आणि पक्षविस्तारासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.