गोंदिया क्राइम: गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपी अटक, 12 किलो गांजा जब्त | Gondia Today

Share Post

2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त..

क्राईम रिपोर्टर.

गोंदिया: जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते.

या आदेशाच्या अमल बजावणित करून स्थानिक गुन्हे शाखेचे, पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात 29/07/2024 रोजी  गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली, भागात येणार आहेत.

IMG 20240730 WA0020IMG 20240730 WA0020

अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने पोलीस ठाणे रामनगर हद्दीत धाड कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य, शासकीय पंच, मापारी, फोटोग्राफर, पो. स्टाफ, सोबत घेऊन रवाना होवून मरारटोली बसस्थानक समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारवाई करण्यात आली. कार्रवाई दरम्यान अवैधरित्या गांजा ची खेप घेवून येणाऱ्या दोघांना मो.सा. सह दुपारी 15.30 वाजता दरम्यान रंगेहाथ पकडण्यात आले.

IMG 20240730 WA0021IMG 20240730 WA0021

त्या दोघांना ही पोलीसांची ओळख देवून त्यांना ताब्यात घेण्याचे कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहिती प्रमाणे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली. त्याचे ताब्यातील निळ्या रंगाच्या ट्रॉली व स्कुल बॅगमध्ये सेलोटेप ने गुडाळलेले (वेस्टन असलेले) 12 नग बंडल मिळुन आलेत….. वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी 12 किलो 160 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा  किंमती एकूण 2,69,500/- (दोन लक्ष एकोंसत्तर हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल) मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.

अवैधरित्या विक्री करीता गांजाची खेप आणणारे आरोपीत ईसम नामे 1) दिनेश विजयकांत मिश्रा, वय 38 वर्षे, रा. काका चौक , सिव्हिल लाइन्स गोंदिया, 2) सोमेश्वर जोशीराम न्यायकरे वय 36 वर्षे राह. गिरोला, पांढराबोडी तां. जि. गोंदिया यांचेविरूध्द अंमलदार पो.हवा. राजेंद्र मिश्रा, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..

दोन्ही आरोपीतांना जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया.गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत..

सदरची दर्जेदार धाड कारवाई  एलसीबी च्या पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो.नि. प्रविण बोरकुटे पो.ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात मपोउपनि-वनिता सायकर पोलीस अंमलदार पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार, मपोशि कुमुद येरणे, यांनी केलेली आहे..