

देवेंद्र रामटेके
गोंदिया/13 : गोंदिया तालुक्यातील दासगाव (खुर्द) येथे दोन चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीषण भीषण दुर्घटना घडली आहे.
आलोक भागचंद बिसेन इयत्ता 3 व प्रिन्स किशोर रहांगडाले इयत्ता 3 व जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक विद्यालय, दासगाव खुर्द असे या छोट्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे आहेत.
दुपारचे जेवण झाल्यावर ते फिरायला बाहेर पडले मात्र परत आलेच नाही. सायंकाळी त्याच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळील खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. गावात शोककळा पसरली आहे.