खा. प्रफुल पटेल व पालकमंत्री घेणार जिल्ह्यातील समस्यांचा आढावा | Gondia Today

Share Post

गोंदिया : खा. प्रफुल पटेल व जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवारी दि.२२ मार्च २०२५ जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी १०:३० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहे. तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन त्या मार्गी लावणार आहेत. या दरम्यान ते जनतेच्या समस्या सुध्दा जाणून घेणार आहेत.

दि. २३ मार्च २०२५ ला रविवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधणार आहेत. तरी कार्यक्रमाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.