परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान कोणीही बदलू शकत नाही – खा.प्रफुल पटेल | Gondia Today

Share Post

IMG 20241117 WA0049IMG 20241117 WA0049

गोंदिया। परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोध करणाऱ्यांना आपण निवडून देणार का..? असे आज भीमनगर मैदान, गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार श्री विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या प्रचार सभेला संबोधित केले. परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानात सर्वांना समान संधी देऊन मतदान देण्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांनी संविधान बदलणार असा नकारात्मक प्रचार करून आपण सर्वांना भ्रमित करण्याचे काम केले आहे. परंतु संविधानाचा मूलभूत ढाचा कोणीही बदलू शकत नाही असे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे याचा आपण सर्वांना विचार करावा.

IMG 20241117 WA0048IMG 20241117 WA0048

कोणताही नकारात्मक विचारला बळी न पडता महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अंमलात आणलेल्या जनहितार्थ कामांना अविरत चालू ठेवण्यासाठी पुढील ५ वर्षाचा विकासाचा व प्रगतीचा विचार करून येणाऱ्या २० तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून विकासाला मतदान करा असे आवाहन खा.प्रफुल पटेल यांनी केले.

सभेला खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद अग्रवाल, नानू मुदलियार, मनोहर वालदे, विनीत सहारे, माधुरी नासरे, अमीत भालेराव, नागो बनसोड, घनश्याम पानतावणे, विजय रगडे, श्याम चौरे, वसंत गणविर, सुधीर कायरकर, प्रशांत सोनपूरे, श्रेयस खोब्रागडे, सोनल मेश्राम, हर्षवर्धन मेश्राम, मंगेश रंगारी, अविनाश महावत, मीनाक्षी गजभिये, अमन घोडेस्वार, राज माने, तुषार श्रीवास सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.