पर्यटन विकासात अर्जूनी मोरगांवाला पुढ़े आणु – खा. प्रफुल पटेल | Gondia Today

Share Post

IMG 20241115 WA0047IMG 20241115 WA0047

महायूतीचे उम्मीदवार राजकुमार बडोले याना विजयी करा.

गोंदिया। अर्जुनी मोरगांव परिसरातील क्षेत्र वन संपदेने नटलेला आहे, हया क्षेत्रात पर्यटनाला वाव आहे. त्यातुनच रोजगार निर्मीती होणार आहे, पर्यटन विकासाचा दृष्टीकोणातून हया क्षेत्राकडे आपले लक्ष्य आहे, हया क्षेत्राला देश पातळीवर पुढे आनणार आहोत शिवाय हया क्षेत्रातिल शेतकऱ्यांना सुजलाम सूफलाम बनविन्याचा दृष्टीने सिंचन व्यवस्था अधिक समृद्ध करण्याचा दृष्टीने पाउल उचले जात आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचा पाणी नवेंगांव बांध पर्यत पोहविण्यात येणार आहे त्याबाबतचे नियोजन केले जात आहे, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले. आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार राजकूमार बड़ोले यांना विजयी करावे असे आव्हान खा. प्रफुल पटेल यांनी केले,

IMG 20241115 WA0048IMG 20241115 WA0048

अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्राचे महायूतीचे उम्मीदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ बिरसा मुंडा प्रतिमेसमोरील पटांगण, इटखेडा या ठिकाणी आयोजीत सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर सर्वश्री प्रफुल पटेल, राजकुमार बड़ोले, नामदेव डोंगरवार, नारायण भेंड़ारकर, उमाकांत ढेंगे, नाजुक कुंभरे, नूतन सोनवाने, दानेश साखरे, रतिराम राणे, तुकाराम मड़ावी, सौ मंजूताई बारसागडे, लोकपाल गहाने, किशोर तरोने, उद्धव मेहंदले, सौ सुशीलाताई हलमारे, सौ आम्रपाली डोंगरवार सहीत मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.