मुख्यमंत्री बनताच फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर, जन्मजात मज्जा प्रत्यारोपण रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत.. | Gondia Today

Share Post

Screenshot 20241206 173645 ChromeScreenshot 20241206 173645 Chrome

मुंबई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाईलवर दिल्या आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. सरकार स्थापन होताच मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर पहिली सही टाकून कामाला सुरुवात केली.