बाबुराव मडावी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा – देवरी, गोंदिया

Share Post

देवरी (गोंदिया)

दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक बाबुराव मडावी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अ. म. पटले होते. या प्रसंगी डी.एस. बनोदे, सी.जी. मुंडे, ओ.बी. चाकोले, आर.डी. चव्हाण, एल.बी. भैरम, एस.एस. वासनिक, पी.एन. किनोले, ए.एस. भेंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी गीत, कविता, नाटिका, भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात आले.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षक जीवनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवतात. शिक्षकांशिवाय समाज व राष्ट्राची प्रगती शक्य नाही.

कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment