सावधान! आता meesho scame होत आहे, कुणीही या लिंक उघडू नका.

Share Post

सावधान!  सर्वांना विनंती आज दिवसभरात Meesho Free Gift यांची लिंक व्हाट्सअप वर वरती येत आहे. कोणत्याही अशा फेक लिंक वर क्लिक करू नका. मोबाईल हॅक होऊ शकतो.

वेगवेगळ्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर meesho gifts नावाने लिंक शेअर केल्या जात आहेत, त्यात मोफत गिफ्ट देण्याचे सांगितले जात आहे,कृपया कुणीही या लिंक ओपन करू नका.. ते एक फसवणूक (scam) आहे. अशा लिंक्सवर क्लिक केल्याने किंवा माहिती दिल्याने तुमचे नुकसान होऊ शकते, जसे की वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरीला जाणे.

download 2025 11 13T135731.918
सुरक्षित रहा: अशा लिंक्सवर क्लिक करू नका.
माहिती देऊ नका: कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती, जसे की बँक तपशील, ओटीपी, आधार किंवा पॅन क्रमांक अनोळखी व्यक्तींना देऊ नका, जरी ते स्वतःला Meesho चे कर्मचारी म्हणवत असले तरी.
Meesho ची अधिकृत माहिती: Meesho तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही, मग ती नोकरीसाठी असो वा प्रशिक्षणासाठी.
तपासणी करा: तुम्हाला कोणत्याही संशयास्पद संदेशाची किंवा ऑफरची खात्री नसल्यास, थेट Meesho च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून संपर्क साधा.

Leave a Comment