तिरोडा
शनिवारी पहाटे गोंदियाजवळील नागरा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. नितेश सुनील वैद्य (रा. रेल्वे चौकी, गौतम बुद्ध वॉर्ड, तिरोडा) असे मृताचे नाव आहे.
आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा तयार केला.
नितेश वैद्य यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिरोडा शहरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.