तालुक्यातील सिलेझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे मंगळवारी (दि. १४) धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य मनोज चांदकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष चंद्रशेखर ठोर होते. या प्रसंगी विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी दैते देवदत्त नंदेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांती श्रीफूल दैते संचलित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश भेंडारकर, सुधीर मेंडे, प्रकाश टेंगुने, अशोक गवंडे, पोलीस पाटील दिनेश चव्हाण, दरशन गवंडर, सुनीता ब्राह्मणकर, हेमराज नन्हे, रोजेश गवंडर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पिरसाम गवंडर यांनी केले. प्रस्ताविक पुष्पलता नंदेरकर यांनी मांडले, तर आभार अमरद शहारे यांनी मानले.
या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.