तिरोडा येथे चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच; रविकांत बोपचे यांनी दिला पाठींबा

Share Post

तिरोडा (ता. प्र.):

 

शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग आणि दुर्बल घटकांसाठी योग्य परिणामकारी पावले न उचलल्याबद्दल प्रशासनाविरोधात तिरोडा तालुक्यातील प्रमुख प्रविण हिरांगणे यांनी उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंडिकोटा येथील चौकात हे उपोषण सुरू असून, रविकांत बोपचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
हिरांगणे यांनी सांगितले की, शासन आणि प्रशासनाकडे अनेक वेळा मागण्यांची निवेदनं देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे न्याय मिळावा, यासाठीच हे उपोषण सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी रविकांत बोपचे यांनी उपोषकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, “शेतकरी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे.”
तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून, लवकरच तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये महेश बोपचे, विनोद ठाकरे, सुरेश भोयर, जॉन गोसावी, केतन माखीजा यांचा समावेश होता.

Leave a Comment