सुनिल टेंभरे यांचा राष्ट्रीय यश – राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्मान

Share Post

तिरोडा –

हैद्राबाद येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग मेन्स फिजिक्स अंडर-21 स्पर्धेत तिरोडा तालुक्यातील साळई खुर्द येथील सुपुत्र सुनिल टेंभरे यांनी तृतीय क्रमांक मिळवून गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

गावकरी आणि कार्यकर्त्यांनी सुनिल टेंभरे यांच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला असून स्थानिक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Comment