चकाक गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघाचा प्रवेश; वन विभागाची तब्बल तीन तासांची मोहिम यशस्वी

Share Post
गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील काचरापार ग्रामपंचायत क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात शनिवारी सकाळी वाघ शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर अखेर वाघाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास किच्छडोली परिसरातून वाघ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला. सकाळी परिसरात फिरणाऱ्या नागरिकांनी वाघ पाहिल्यानंतर गोंधळ उडाला आणि पोलिसांना कळविण्यात आले.
वन विभागाने विशेष टीम तयार करून परिसर बंदिस्त केला. तज्ज्ञांनी ड्रोन आणि ट्रॅंक्युलायझरच्या मदतीने वाघाला झोपी घालून पकडले.
वन अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नामुळे मोहीम यशस्वी ठरली. वाघाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. सुदैवाने या मोहिमेदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment