‘पिंजरा’ व ‘दो आँखे बारह हाथ’ सारख्या अनेक अजमहर कलाकृतींच्या माध्यमातून आपल्या अनोख्या नृत्य-अभिनयाने रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या संध्या शांताराम (वय 74) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी 1950 ते 70 च्या दशकात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये अक्षरशः गाजावली. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा किरण शांताराम, नातू चेतन्य शांताराम आणि नातवंडे असा परिवार आहे.
संध्या यांचे मूळ नाव विजय श्रीधर देशमुख होते. अभिनेत्री रंजना यांची आई वत्सला देशमुख आणि रणजीपदू जिंदेंद्र ठोकरें यांची आई लीला देशमुख या दोघी त्यांचा बहिणी. चित्रपट निर्माता- दिग्दर्शक वी. शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या.
संध्या यांनी ‘अमर भूपाळी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘पिंजरा’, ‘स्त्री’, ‘जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली’ आदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘पिंजरा’ आणि ‘चंदनाची चोल्ली अंग अंग जाळी’ या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेलो चार-पाच दशके त्या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या.